ही कहाणी परंपरागत चालत आलेली रूढी नाकारणाऱ्या माणसाची आहे .बायकोला सॅल्युट करणाऱ्या नवऱ्याची आहे .अनेकदा बाहेर समतेच्या गोष्टी झोडणारे घरात पारंपरिक कुटूंबसंस्थेसमोर माघारी होतात. घरोघरी बघीतल्या जाणाऱ्या कितीतरी मालिका फिक्या पडतील अशी प्रेरणादायी परिवर्तनशील एका माणसाची गोष्ट👍
.............................................................................
लग्नादिवशी दारात लावलेली केळीची पानं सुकून गेलीत... लग्नाला आलेले मोजकेच पाहुणे घरात...
नवरी भरजरी साडीतून अवघडत उठून उभी राहते...
अन् अन्...
अचानक नवरा समोर येतो...
'आजपासून साडीत अवघडायचं नाही, हे घे पंजाबी ड्रेस, आतली रूम तुझी... आणि एेक, ही पुस्तकं, अभ्यास कर... दोन वर्षांत पीएसआय बनायचं'
हनीमून का काय असतं, त्याला न जाता बायकोचा अभ्यास घेत राहिला नवरा... प्रणयमूल्यांकित गोलगप्पा मारण्यापेक्षा जनरल नॉलेज शिकवत राहिला नवरा...
Jaydip Pisal-Deshmukh हे दोनदा एमपीएससी पास झाले... पीएसआय आणि कुठलीशी पोस्ट मिळाली...
वाठार स्टेशनला तीन मिनिटं रेल्वे थांबायची, तेवढ्या वेळेत दहा-बारा ग्लास उसाचा रस विकायचा... त्यातनं ग्लासमागे रुपयाचा ठोकळा मिळायचा...
असलं झांगड करत जयदीपराव एमपीएससी दोनदा पास झाले...
पण... पण...
'व्यवसाय करू, गावाची सेवा करू' म्हणत पोस्ट नाकारल्या...
हीरो-होंडाची सेमी-फ्रच्नायझी घेतली, पळशीचे सरपंच झाले... खाचखळग्याच्या गावात सिमेंटचे रस्ते केले... गावाशेजारचा बंधारा बांधला... 'पानी फाऊंडेशन'चं काम केलं... पळशी गौरव पुरस्कार सोहळा परमोच्च केला... आणि काय काय...
एमपीएससी पास होऊनही पोस्ट न घेणाऱ्या जयदीपरावांची भागात छी-थू झाली...
एमपीएससीचं फॅड असलेले तरूण जयदीपरावांकडे 'माजोरडा' म्हणत तुच्छतेनं पाहू लागले..
विजयाच्या आनंदाला लपवत, पराभवाची बोच पचवणारे जयदीपराव हलले नाहीत... लढत राहिले...
पण वाळल्या-करपल्या जगण्याच्या जळण्यात एक ओल होती मनात... करपतानाही मनात एक ऊबदार जाळ होता पेटलेला...
Kalyani Pisal वर जीव जडला होता...
'अय पोरा, काम ना धाम, यमपीयस्सी पास हुऊन बोंबलत फिरतूय, दुनयादारी-गावपुढारी झालायस, तुला पोरगी देण्यापरीस विहिरीत ढकलून दीन पोरगी'
कल्याणीच्या बापाचे हे शब्द...
'तुमच्या पोरीला दोन वर्षांत पीएसआय करतो, माझ्यावर विश्वास ठेवा' म्हणणाऱ्या या पोराला कल्याणी मिळाली...
पूजेनंतर अवघ्या दोन वर्षांत कल्याणी पीएसआय झाली...
सगळं माहित पडत होतं...
एकदा जयदीपरावांना विचारलं...
'हीरो-होंडाचा व्यवसाय जोरातय, गावात सरपंचय, भागांत दबदबाय, लोक नमस्कार करतात, आता काय स्वप्न राह्यलंय?'
'काका, सगळं मिळालं, तिचं ट्रेनिंग संपलं की युनिफॉर्मवरच्या बायकोला एकदा सॅल्यूट मारायचाय'
कल्याणीचा आज वाढदिवस, म्हणून मगाशी जयदीपरावांशी बोललो...
'काका, कल्याणीला पोलिस स्टेशनला सोडून घरी आताच आलोय, ती दुपारीच घरी आली होती, पण अचानक नाईटला जावं लागलं... करतीय कष्ट, पण ह्या कष्टातच समाजसेवा आहे, वाढदिवशी सेवा करायला भाग्य लागतं.'
जयदीपराव तुम्ही बायकोला स्यॅल्यूट मारलात...
कल्याणी माझी बहीण आहे... मी तिला सॅल्यूट तर मारणारच...
पण तुमच्या पायावर डोकं ठेवतो...
जय हिंद..!
..................…...................................................….
🏵धन्यवाद..!!🏵
🌱पोस्ट शेअर... अन पेज लाईक करून घ्या...आश्याच सुंदर पोस्टसाठी
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
0 टिप्पण्या