निवांत वाचा. खरोखर छान वाटेल | Marathi Suvichar || छान विचार || सुंदर विचार || Sundar vichar || Quote

​निवांत वाचा. खरोखर छान वाटेल


🔴 कुणाच्या सांगण्यावरुन आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले वा वाईट मत बनवण्यापेक्षा, आपण स्वतः चार पावले चालुन समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधुन मगच खात्री करा. 
🔴 नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे ...बोलताना शब्दांची उंची वाढवा आवाजाची उंची नाही.
कारण..पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते,विजांच्या कडकडाटामुळे नाही..                                         🔴वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं..डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस!! निवड आपली आहे.."                                 
  🔴कुणा वाचून कुणाचे काहीच आडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.
🔴डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत,अन्...भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत. 
🔴जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणुन..!
🔴मोर नाचताना सुद्धा रडतो...आणि...राजहंस मरताना सुद्धा गातो...दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही...आणि 
सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.यालाच जीवन म्हणतात.
🔴किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,मग जगावे ते हसून-खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नाही. 

😊😊 😊😊 ​म्हणून नेहमी आनंदी राहा​🤗🤗🤗🤗

*मला हि पोस्ट आवडली म्हणुन मि खास लोकांना पाठवत आहे..




आमचे नवे मराठी संस्कार 2 चँनल
https://youtube.com/channel/UCx6U_-6O_UED0WdaqDdUOsA

 कथा, कविता, प्रसिध्द कविच्या कविता, सुंदर विचार, सुविचार ,प्रेम कथा, भाषण, लग्न कथा तसेच थोर व्यक्तीची माहीती इतिहास हे सगळ-सगळ काही एकाच ठिकानी पाहण्यासाठी मराठी संस्कार २ ला अत्ताच.सबस्क्राईब करा
आता सध्या आम्ही जास्तीत जास्त मराठी संस्कार.२ वरच सर्व व्हिडिओ शेअर करतोत






​👌जगातील सर्वात सुंदर msg...​


​"आयुष्यात कितीही चांगली कर्म करा"...​
*"कौतुक हे स्मशानातच होतं".....!!
निवांत वाचा. खरोखर छान वाटेल |



 Marathi Suvichar || छान विचार || सुंदर विचार || Sundar vichar || Quote


🌹।। *मनापासून शांतपणे वाचा* ।। 🌹
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
 जिथं आपली कदर नाही,
 तिथं कधीही जायचं नाही.
 ज्यांना खर सांगितल्यावर राग येतो, 
त्यांची मनधरणी करत बसायचे नाही. 
जे नजरेतून उतरलेत त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही.
_______________________________
आपल्या हातून एखाद्याचे काम होत असेल तर ते निःस्वार्थ बुद्धीने आणि निःसंकोचपणे करा.
 नेहमी दुसऱ्याला मदत करा दुसऱ्याला त्रास होईल असे कदापि वागू नका.
_______________________________
नेहमी स्वतःसोबत पैज लावा, जिंकलात तर *आत्मविश्वास* जिंकेल, आणि हारलात तर *अहंकार* हारेल.
_______________________________
पाण्याने भरलेल्या तलावात *मासे* किड्यांना खातात, आणि जर तोच तलाव कोरडा पडला तर *किडे* माश्याना खातात. 
*संधी* सगळ्यांना मिळते. फक्त आपली *वेळ* येण्याची वाट पाहा_____!
_______________________________
एखाद्या व्यक्तीजवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की नंतर त्याच्याजवळ आपला विषय जरी निघाला तर,
 त्याच्या ओठांवर थोडसं *हसू* आणि डोळ्यात थोडसं *पाणी* नक्कीच आलं पाहिजे____ !
_______________________________
तुम्ही स्वतःच्या खांद्यावर डोके टेकून *रडू* शकत नाही आणि
 स्वतःच स्वतःला आनंदाने *मिठी* ही मारू शकत नाही______ !
*आयुष्य* म्हणजे दुसऱ्यांसाठी जगायची बाब आहे_______ !
_______________________________
जगातील सर्वात सुंदर रोपटे *विश्वासाचे* असते
 आणि ते कोठे जमिनीवर नाही तर आपल्या *मनात* रुजवावे लागते______ !
_______________________________
वादळे जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचं असतं. 
ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात. 
वादळ महत्त्वाचे नसते. 
प्रश्न असतो की, आपण त्यांच्याशी कशी *झुंज* देतो 
आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.________ !
_______________________________
जगातील कुठलीच गोष्ट *परिपूर्ण* नाही.
 परमेश्वराने *सोन* निर्माण केलं. चाफ्याची *फुल* सुद्धा त्यानीच निर्माण केली. 
मग त्याला सोन्याला चाफयाचा *सुगंध*  नसता का देता आला ? अपूर्णतेतही काही मजा आहेच की._______ !
_______________________________
दगडात मूर्ती असतेच. त्याचा फक्त नको असलेला भाग काढून टाकायचा असतो.
 आणि मग ह्याच भावनेने माणसाकडे पहा.
 माणसातही नको असलेला भाग दूर करायला शिका.________!
_______________________________
 जेव्हा अडचणीत असाल तेव्हा *प्रामाणिक* रहा. 
जेंव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेंव्हा *साधे* रहा.
 जेव्हा एखादे पद किंवा अधिकार असेल तेव्हा *विनयशील* रहा.
 जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा *शांत* रहा.________ !
_______________________________
आपण हरवण्यासारखं आयुष्यात जरूर घडायला हवं,
 कारण अशा स्थळावरून परतताना माणूस *माणूस* राहत नाही. परतून येत ते *चैतन्य*__________! 
_______________________________
सोन्याची* एक संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीच *सोन* करा. 
समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो. 
काहीजण त्यातून *मोती* काढतात, तर 
काहीजण त्यातून *मासे* काढतात
 तर काहीजण फक्त *पाय* ओले करतात..
 हे *विश्व* पण सर्वांसाठी सारखेच आहे.
 फक्त तुम्ही त्यातून काय घेता हे *महत्त्वाचे* आहे._______!
_______________________________
तुम्ही कोणासाठी कितीही केले, तरी
 ते कोठेतरी कमीच पडते. 
कारण *सत्य* चप्पल घालून तयार होईपर्यत, 
*खोट* गावभर हिंडून आलेलं असत._________!
_______________________________
 प्रेमळ माणस तुम्हाला कधी *वेदना* देतीलही, पण
 त्यांचा उद्देश फक्त आणि फक्त तुमची *काळजी* घेणं हाच असतो.
_______________________________
 जगातील कटू सत्य 
, *नाती* जपणारा नेहमी सर्वांपासून दुरावला जातो.________!
_______________________________
नेहमी लक्षात ठेवा की, " आपल्याकडे असलेल्या संपत्तीचा *बडेजाव* करू नका.
 भरकटलेल्या जहाजात कितीही *पैसा* असला तरी पिण्याचे *पाणी* मिळत नाही. जमिनीशी जोडलेले राहा.____________!
_______________________________
 पदाचा, संपत्तीचा कधीही *गर्व* करू नये.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
🌸🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌸
•••••••••••••••••••••••••••••••••••••••
🙏 आवडलच तर समूहावर ( ग्रुपवर ) पाठवा. विचार *छान* वाटले म्हणून मी पाठवितो आहे.________!

_______________________________

नमस्कार मीत्रानो  *मराठी* *संस्कार* या चँनल वर आपले सर्वांचे स्वागत आहे    मित्रांनो  मी तुमच्यासाठी घेऊण आलो आहे तुमच्या मनाला स्पर्श करणारी हृदयाला भिडणारी काही वाक्य , मराठी नवीन विचार..
सुविचार .........

                             : ्््््््

१) या जगात कुठलीच गोष्ट कायम स्वरुपी रहात नाही, तुमचं दु:ख सुद्धा.

२)मला पावसात चालायला आवडतं कारण पावसांत माझे अश्रु कोणीच पाहू शकंत नाही. 

३)ज्या दिवशी आपण हसलो नाही,तो दिवस आप ल्या आयुष्यातील फुकट गेलेला दिवस.
 आवडलेली काही वाक्ये;
💐💐💐💐💐💐💐💐  ______________________________________
. .. वाटेवरून चालताना वाटेसारख वागावं लागतं.. , आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळवाच लागतं.. . .. 
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸  ______________________________________
. .. ज्यांच्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला अशा सगळ्यांचा मी ऋणी आहे.. , कारण त्यांच्यामुळेच मला कसं वागायचं नाही हे चांगलेच कळलेय.. . . 
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷  ______________________________________
. .. "चांगली वस्तु"., "चांगली व्यक्ती"., "चांगले दिवस".. , यांची किंमत "वेळ निघून गेल्यावर समजते".. . .. 
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀   ______________________________________
. .. आशा सोडायची नसते., निराश कधी व्हायचं नसतं.. . अमृत मिळत नाही.. , म्हणून विष कधी प्यायचं नसतं.. . ..
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹  ______________________________________
. .. जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल.. , पण जर तुमची जीभ गोड असेल तर., हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल.. . ..🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁  ______________________________________
. .. "चांगली वस्तु"., "चांगली माणसे"., "चांगले दिवस आले की माणसाने "जुने दिवस विसरू नयेत".. . .. 
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻  ______________________________________
. .. पाणी धावतं., म्हणून त्याला मार्ग सापडतो.. . त्याप्रमाणे., जो प्रयत्न करतो त्याला यशाची., सुखाची., आनंदाची वाट सापडते.. . ..
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺  ______________________________________
. .. नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे.. , कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात., तर आयुष्यभर एकटे राहाल.. . .. 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  ______________________________________
. .. जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण.. , कारण ही विसरता येत नाही., अन त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही.. . .. 
💐💐💐💐💐💐💐💐   ______________________________________
. .. आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. , परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते.. , पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला "स्वभावाच" ठरवतो.. . .. 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸  ______________________________________
. .. हे देवा., माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना दिर्घायुष्य लाभू दे., आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू दे.. . .. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷  ______________________________________
. .. तिच्या डोळ्यांत पाहिले तेव्हा समजले प्रेम कशाला म्हणतात.. , आणि ती सोडून गेली तेव्हा समजले खरं प्रेम कशाला म्हणतात.. . ..🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀  ______________________________________
. .. प्रेम म्हणजे., समजली तर भावना., केली तर मस्करी., मांडला तर खेळ., ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास., रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन.. . ..
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹  ______________________________________
. .. जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले.. , कारण., "समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा., आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम".. . ..
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻  ______________________________________
. .. आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही., सुविचार पण असावे लागतात.. , आपण कसे दिसतो., ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.. . .. 
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺  ______________________________________
. .. गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.. , अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते.. . .. 
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁  ______________________________________
. .. तुम्हाला जर मित्र हवे असतील,  तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना.. , चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका.. . .. 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  ______________________________________
. .. केवड्याला फळ येत नाही पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो.. . .. 
💐💐💐💐💐💐💐💐  ______________________________________
. .. तुम्ही कायम सदैव खुश राहा आणि आनंदात जगा.. . ..🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸  ______________________________________
. .. जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला विचारा.. . .. 
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷  ______________________________________
. .. बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.. . ..
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹  ______________________________________
. .. गुलाबाला काटे असतात.. , असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो., असे म्हणत हसणे उतम.. . .. 
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁   ______________________________________
. .. वेदनेतूनच महाकाव्य निर्माण होते.. . .. 
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸   ______________________________________
. .. भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो., भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो.. , पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो.. . .. 
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀  ______________________________________
. .. मृत्यूला सांगाव., ये कुठल्याही रुपाने ये.. , पण जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आह., तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावं लागेल.. . .. 
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷  ______________________________________
. .. मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.. . .. 
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 ______________________________________
. .. ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो.. . .. 
💐💐💐💐💐💐💐💐 ______________________________________
. .. जखम करणारा विसरतो., पण जखम ज्याला झाली 
तो विसरत नाही.. . .. 

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻



आमचे नवे मराठी संस्कार 2 चँनल
https://youtube.com/channel/UCx6U_-6O_UED0WdaqDdUOsA

 कथा, कविता, प्रसिध्द कविच्या कविता, सुंदर विचार, सुविचार ,प्रेम कथा, भाषण, लग्न कथा तसेच थोर व्यक्तीची माहीती इतिहास हे सगळ-सगळ काही एकाच ठिकानी पाहण्यासाठी मराठी संस्कार २ ला अत्ताच.सबस्क्राईब करा
आता सध्या आम्ही जास्तीत जास्त मराठी संस्कार.२ वरच सर्व व्हिडिओ शेअर करतोत










सुंदर विचार 

      *पैशाने पुर्ण झालेली स्वप्न,*
          *मरेपर्यत टिकतात..*
      *कष्टाने पुर्ण झालेली स्वप्न,*
          *इतिहास घडवतात..*
        
 *घरातून बाहेर जाताना हुशार बनून जा कारण जग एक बाजार आहे ....*
 *""परंतु घरी जाताना एक हृदय घेऊन जा कारण तिथे एक कुटुंब आहे ""....*                                        

*कुणाच्या नशिबाला हसू नये*
               *नशिब कुणी विकत घेत नाही*
       
*वेळेचे नेहमी भान ठेवावे*..
           *वाईट वेळ सांगून येत नाही*.!

*बुद्धी कितीही तल्लख असली तरी*
          *नशिबाशिवाय जिंकता येत नाही*, 
  
 *बिरबल बुद्धीवान होता तरीही तो*           
             *राजा होऊ शकला नाही*.!

     *समाधान ही अंत:करनाची* *सर्वात सुंदर संपत्ती आहे.*
*ज्याला ही संपत्ती मिळाली,तो जगात सर्वात सुखी मनुष्य आहे.*

*"अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी व्यक्ती* *आपल्या अंतकरणातील तीन गोष्टी ओळखेल*
*हसण्यामगील दुःख*
*रागवण्या मागील प्रेम*
*आणि शांत रहाण्यामागील कारण."

*कपडे* नाही 
माणसाचे *विचार*
*Branded* पाहिजे...!

*चुकीच्या* बाजूला उभा राहण्यापेक्षा 
*एकटं* उभं रहाणं केव्हाही चांगलं.
                  

👍👍👍👍
!! खूप सुंदर विचार आहे वेळ असेल तर नक्की वाचा !!

🚶  हळू हळू वाचा खुप आनंद घ्याल ........

🚶🏾👌संकटाच्या वेळी मदत मागाल तर विचार करून मागा कारण संकट थोड्या वेळासाठी असतं पण उपकार आयुष्यभर राहतात......✍

🚶🏾👌ज्या घावातून रक्त निघत नाही, समजून जा तो वार कोणी आपल्यानेच केला आहे...✍

🚶🏾👌नेहमी छोट्या छोट्या चुका सुधरायचा प्रयत्न करा कारण मनुष्याला पहाडाने नाही तर छोट्या दगडानेच ठेच लागते.....✍

🚶🏾👌दुसऱ्या ला संपवण्याच्या प्रयत्नात स्वतः संपून जाल
त्या मुळे स्वतः च्या प्रगती कडे लक्ष दया!!!.....✍

🚶🏾👌जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं.
आणी जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी......✍

🚶🏾👌क्षेत्र कोणतेही असो...
आयुष्यात कष्टाला पर्याय नाही
आणि कष्ट प्रामाणिक असले....
की यशालाही पर्याय नाही..✍🏻

🚶🏾👌केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं....✍

🚶🏾👌"माणुस" स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजे..., 
लोकांच काय लोक " चुका" 
तर "देवात" पण काढतात.....✍

🚶🏾👌सुखासाठी कोणाकडे हात जोडू नका,वेळ वाया जाईल....
हि दुनिया मतलबी झाली आहे,त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा,चांगली वेळ येईल....✍

🚶🏾👌जेंव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेंव्हा समजून घ्यावं की.....तुम्ही त्यांच्या दोन पाऊले पुढे आहात.....✍

🚶🏾👌विरोधक तयार करण्यासाठी मारामारी करावी लागत नाही...!!
तुम्ही चांगले कार्य करु लागले की विरोधक आपोआप तयार होतात...!!✍

🚶🏾👌कर्तृत्ववान व्यक्तींचा पराक्रम बघितला जात नाही..., 
पण त्याचं चाक जमिनीत कधी अडकतय याकडे मात्र सर्वाचे लक्ष असते.....✍

🚶🏾👌एक मात्र नक्की खंर आहे की,चांगल्या रस्त्याला गतिरोधक,आणि......चांगल्या व्यक्तिला विरोधक हे असतातंच.....✍

🚶🏾👌चांगल्या कामाला मांजरां पेक्षा माणसेच जास्त आडवी येतात.....✍

🚶🏾👌एक सत्य  . . . 👇"नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की हवी असणारी माणसं गमावण्याची वेळ येते ".....✍

🚶🏾👌असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते, दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही.....✍

🚶🏾👌"जेवणात जर कोणी विष कालवले तर त्यावर उपचार आहे परंतु मनामध्ये जर कोणी विष भरवले तर त्यावर कोणताच उपचार नाही.".....✍

🚶🏾👌क‍‍‌‌‌‍धी‍ही मिठासारखं आयुष्य जगु नका,की लोक तुमचा चवीनुसार गरजेपुरता वापर करुन घेतील.....✍

🚶🏾👌आयुष्यात स्वत:ला कधी उध्वस्त होउ देऊ नका
          कारण
लोक ढासाळलेल्या घराच्या वीटा सुद्धा सोडत नाही.....✍

👌🏻👌🏻 .




जळायला काही नसलं की पेटलेली काडीसुध्दा आपोआप विझते.

खर्च झाल्याचं दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो.

प्रोब्लेम्स नसतात कोणाला? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर असतंच.
ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं. या तिन्ही गोष्टीपलीकडला प्रोब्लेम अस्तित्वातच नसतो.

शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो. बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो.

माणूस अपयशाला भीत नाही. अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर? याची त्याला भिती वाटते.

बोलायला कुणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोचणं ही शोकांतिका जास्त भयाण.

खरं तर सगळे कागद सारखेच…
त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते.

रातकिडा कर्कश ओरडतो यात वादच नाही. त्याचा त्रास होतो.
पण त्याहीपेक्षा जास्त त्रास तो कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही, याचा होतो.

आपलाही कोणाला कंटाळा येऊ शकतो ही जाणीव फार भयप्रद आहे.

कोणत्याही सुखाच्या क्षणी आपण होशमध्ये असणं यातच त्या क्षणाची अपूर्वाई आहे.

रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगू शकतो. पण तुळस वृंदावनातच राहते. तिच्यापुढे आपल्यालाच उभं राहावं लागतं.

ज्यांच्या असण्याला अर्थ असतो, त्यांच्याच नसण्याची पोकळी जाणवते.

आयुष्य फार सुंदर आहे…
ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे…
माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे…


*Very nice thought*



*आयुष्य फार लहान आहे. जे आपल्याशी चांगले वागतात , त्यांचे आभार माना आणि जे आपल्याशी वाईट वागतात , त्यांना हसून माफ करा.*

*जीवनात अडचणी येणे हे 'Part of life' आहे. आणि त्यातून हसत बाहेर पडणे ही 'Art of life' आहे.*

*यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केंव्हाही चांगलं. कारण , यशाची व्याख्या लोकं ठरवितात , समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो.*

*आरसा आणि ह्रदय , दोन्ही तसे नाजूक असतात.फरक एवढाच आरश्यात सगळे दिसतात , आणि ह्रदयात फक्त आपली माणसेच दिसतात.*


*एका फुग्यावर लिहिलेले सुंदर वाक्य...जे आपल्या बाहेर आहे ते नाही , तर जे आपल्या आतमध्ये आहे ते आपल्याला उंच घेऊन जाते.*



*"सगळीच वादळं काही तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करायला येत नाहीत तर त्यातील काही तुमचा रस्ता मोकळा करण्यासाठी पण येतात."*


     

एक छान मेसेज आलाय म्हणून तुम्हाला पण वाचायला देतो




आमचे नवे मराठी संस्कार 2 चँनल
https://youtube.com/channel/UCx6U_-6O_UED0WdaqDdUOsA

 कथा, कविता, प्रसिध्द कविच्या कविता, सुंदर विचार, सुविचार ,प्रेम कथा, भाषण, लग्न कथा तसेच थोर व्यक्तीची माहीती इतिहास हे सगळ-सगळ काही एकाच ठिकानी पाहण्यासाठी मराठी संस्कार २ ला अत्ताच.सबस्क्राईब करा
आता सध्या आम्ही जास्तीत जास्त मराठी संस्कार.२ वरच सर्व व्हिडिओ शेअर करतोत






☝कमीपणा घ्यायला शिकलो 
      म्हणून... आजवर खूप 
      माणसं कमावली...
      हिच आमची श्रीमंती...!!

 ☝नाते सांभाळायचे असेल तर
      चुका सांभाळून घेण्याची
      मानसिकता असावी ...
      आणि
      नाते टिकवावयाचे असेल तर
      नको तिथे चुका काढण्याची
      सवय नसावी ...

☝ताकद आणि पैसा हे 
     जीवनाचे फळ आहे.
     परंतु कुटुंब आणि मित्र प्रेम 
     हे जीवनाचे मूळ आहे.

☝तुमच्या पाठीशी किती जण 
     आहेत हे मोजण्यापेक्षा, तुम्ही 
     किती जणांच्या पाठीशी आहात 
     याला महत्त्व आहे.
     
☝"एखादे संकट आले की, 
     समजायचे त्या संकटाबरोबर
     संधी पण आली.
     कारण संकट हे कधीच 
     संधीशिवाय एकटा प्रवास 
     करत नाही.
     संकट हे संधीचा राखणदार 
     असते. फक्त संकटावर मात 
     करा, मग संधी तुमचीच आहे". 

 ☝"वडाचे झाड कधीच पडत 
       नाही, कारण ते जेवढे वर 
       वाढते तेवढेच ते जमिनीखाली
       पसरते. जीवनात तुम्हाला  
       जर पडायचे नसेल तर स्वत:
       चा विस्तार वाढवतेवेळी 
       चांगल्या मित्रांची सोबत 
       वाढवा".

☝आयुष्यात  सुई  बनून रहा. 
     कैची  बनून राहू नका. कारण
     सुई  दोन  तुकड्यांना  जोडते, 
     आणि  कैची एकाचे  दोन 
     तुकडे  करते...
____________________________________________________________________________________________

 हुशार व चाणाक्ष माणसं आपल्या शत्रुकडुनही काहीतरी शिकत असतात, 
याउलट, 
मुर्ख माणसं आयुष्यभर आपल्या मित्रांनाच आपले स्पर्धक अथवा शत्रु मानत असतात.''... जर नशिब काही "चांगले" देणार असेल तर त्याची सुरूवात "कठीण" गोष्टीने होते..आणी नशीब जर काही "अप्रतीम" देणार असेल तर त्याची सुरूवात "अशक्य" गोष्टीने होते...


___________________________________________________________________________

सुंदर विचार.........

*कमकुवत लोक सूड घेतात,*
*मजबूत लोक क्षमा करतात ,*
*आणि बुद्धिमान लोक* 
*दुर्लक्ष करतात.👍🏻*

🌿🌸सुप्रभात🌸🌿
 *आयुष्य म्हणजे ..... !*
*शोधला तर अर्थ आहे ......!!*
*नाहीतर नुसता स्वार्थ आहे....... !!!*
       
 *✍•••" अपेक्षा जरूर बाळगा पण नाती आणि माणसं तुटणार नाहीत* *याची फक्त काळजी घ्या•••*
     🌹🙏 *शुभ सकाळ*🙏🌹




*🔆🌸🔅     सुंदर विचार        🔅🌸🔆*

        *माणसाच्या परिचयाची सुरुवात*
        *जरी चेहर्‍याने होत असली तरी,*
               *त्याची संपूर्ण ओळख*
       *वाणी,विचार आणि कर्मांनीच होते.*

       *कोणी आपल्याला वाईट म्हंटलं तर*
          *फारसं मनावर घेवु नये कारण,*
          *या जगात असा कोणीच नाही*
         *ज्याला सगळे चांगलं म्हणतील.*
    *💐🌹🌹  💐*
-----------------------------------------------------------
*😊एक सुंदर वाक्य*  .....👌🏼

 *शरीर जितकं फिरतं राहील*
*तेवढं स्वस्थ राहतं* 💪🏼

*आणि*😊

*मन जितकं स्थिर राहील*
*तेवढं शांत राहतं.*         
    *।। शुभ  सकाळ ।।*
*छान   वाक्य*         

*ङोगरावर चढणारा  झुकूनच  चालतो...*
*पण  जेव्हा   तो  उतरू  लागतो तेव्हा  ताठपणे  उतरतो ....*
*हा निसर्गाचा  नियम आहे....*
*कोणी  झुकत  असेल  तर* *समजावे  की तो उंचावर जात* *आहे*
*आणी*
*कोणी  ताठ वागत असेल तर  समजावे की तो खाली  चालला  आहे...*
*घेण्यासारख* *आहे.जमलच तर घ्या.*

*दोन हात करु नका*
   *दोन हात जोडायला शिका.**


✍✍✍

    *👌👌छान वाक्य  👌👌*

  *सुखासाठी जे काही कराल त्यात आनंद मिळेलच असे नाही...,*

*परंतु आनंदाने जे कांही कराल त्यात सुख नक्की मिळेल...!!*
        *💐 Good morning 💐*


सुविचार

“मोठी व्यक्ती संधी मिळाली नाही अशी तक्रार कधीच करीत नाही.”


“संयम नावाच्या कटू वृक्षाचे फळे नेहमी गोड असतात.”





“जबाबदारी पडली कि ती शिकवतेच.”

“धडपडी नंतर विश्रांती सुखकर असते.”




“स्वाभिमान हा सर्वच सद्गुणांचा पायाच म्हणता येईल.”

“मौन ठेवले तर चांगलेच होते, वाईट होत नाही.”

“खरे शहाणपणाचे उत्तर म्हणजे मौन होय.”

“विश्रांती देणारे एकमेव औषध म्हणजे झोप.”

“जीवनातील यश हे खूप कष्टाने मिळते.”


“दुःखातून येणारे सुख हे मधुर असते.”

“संशयातून संशयच उत्पन्न होतो.”







“इच्छापूर्ती झाली म्हणजे ती आत्म्याला मधुर वाटते.”


“या जगात सर्वात सोपी आणि निरुपयोगी गोष्ट म्हणजे चिंता करणे.”

“श्रमातून जे फळ मिळते ते सर्व प्रकारच्या सुखात अत्यंत मधुर असते.”





“अशक्य गोष्ट ती कि जिच्यासाठी प्रयत्न केलेले नसतात.”

“उपाशी पोटी साधे अन्न देखील रुचकर लागते.”

“जो निष्पाप असतो, त्याला सुखाची झोप लागते.”

“दिवस कितीही मोठा असला तरीही त्याचा अंत होतोच.”

“तलवारीपेक्षा लेखणीचे सामर्थ्य अधिक असते.”

“श्रम करणाऱ्याला गोड झोप लागते.थोड्या आनंदात गोडी असते.”

“द्वेष करणाऱ्या माणसाची नजर फार तीक्ष्ण असते.”

“दुःखातून येणारा आनंद सुखमय असतो.”

“आपण जिंकू असा विश्वास असलेलेच विजयी होऊ शकतात.”

“साधे जीवन जगणे ही जगातील सर्वात चांगली गोष्ट आहे.”

“उपकार घेणे म्हणजे स्वतःचे स्वातंत्र्य गमावणे होय.”



“सर्वात मोठे वरदान म्हणजे खरा मित्र लाभणे.”



“घाबरटाला सारेच अशक्य असते.”



“एका रात्रीत तयार झालेल्या बर्फावर विश्वास ठेवू नका.”

Sundar Vichar in Marathi

“सत्य कोणत्याही कसोटीला घाबरत नाही.”

“सत्याला शपथांच्या आधाराची गरज नसते.”
Marathi vichar

Marathi vichar

Marathi vichar







*हळू  हळू एक एक शब्द वाचा*
*प्रत्येक वाक्यात किती अर्थ आहे*

"अश्रु" _सांगून जाते,_ "दुःख"  किती आहे ?

"विश्वास" _सांगून जातो,_ "जोडीदार"  कसा आहे?

"गर्व" _सांगून जातो,_ "पैशाचा माज"  किती आहे?

"संस्कार" _सांगून जातात,_ "परिवार"  कसा आहे?

"वाचा" _सांगून जाते,_ "माणूस"  कसा आहे?  

"संवाद" _सांगून जातात,_ "ज्ञान"  किती आहे?

"ठेच" _सांगून जाते,_ "लक्ष"   कुठे आहे?

"डोळे" _सांगून जातात,_ "व्यक्ती"  कशी आहे ?

"स्पर्श" _सांगून जातो,_ "मनात"  काय आहे ?

आणि "वेळ" _दाखवते,_ "नातेवाईक"  कसे आहेत.


भावकीतली चार माणसं *" एका दिशेने "* तेव्हाच चालत असतात जेव्हा पाचवा खांद्यावर असतो. 

संपूर्ण आयुष्य आपण याच विचारात जगत असतो की *" लोक काय म्हणतील " ?* आणि शेवटी लोक हेच म्हणत असतात की *" राम नाम सत्य है "*..........

           माणसाची कदर करायची असेल तर जिवंतपणीच करा. 

कारण तिरडी उचलण्याच्या वेळी तिरस्कार करणारे सुद्धा रडतात. 

मेल्यावर माणूस चांगला होता असं म्हणण्याची प्रथा आहे आणि जिवंतपणी माणूस ओळखता येत नाही हीच खरी व्यथा आहे. 
म्हणून माणसांना जिवंतपणीच समजून घ्या. 

मेल्यावर समाधीवर फुलं वाहण्यात काहीच अर्थ नसतो .......
   
        चांगल्या माणसावर एवढा विश्वास ठेवा जेवढा आपण आजारपणात औषधांवर ठेवतो. 
कारण औषध जरी कडू असलं तरी ते आपल्या फायद्याचे असते. 


चांगल्या माणसांच सुद्धा अगदी तसचं असतं .....









51 विचार मराठी



1 भरलेला खिसा माणसाला दुनियी दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.

2. स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.

3. ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही.

4. चुकण हि ‘प्रकृती’, मान्य करण हि ‘संस्कृती’ आणि सुधारणा करण ही ‘प्रगती’ आहे.

5. समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.

6. शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येत.

7. आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन.

8. नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही.

9. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

10. स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.

11. कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.

12. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.

13. मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.

14. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा.

15. खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?”

16. या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते, तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्वकाही असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.

17. “जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.”

18. डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

19. भूक आहे तेवढे खाणे हि प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे हि विकृती आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे हि संस्कृती..

20. यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे.

21. माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं.

22. आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.

23. जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल, हसा इतके कि आनंद कमी पडेल, काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा कि परमेश्वराला देणे भागच पडेल ………..

24. शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण.

25. कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे रहावे लागते.

26. कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच, कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी.

27. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे कि, जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो, पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे, ज्यामुळे तत्काळ सुख मिळत, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते.

28. मानवाचा दानव होणे ही त्याची हार, मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा माणूस होणे हे त्याचे यश आहे.

29. आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना तुम्ही आवडता, त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते, अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.

30. स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका, तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करता आहात.

31. चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.

32. विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.

33. सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाचवेळी रडतात एकाचवेळी झोपतात ते ही आयुष्यभर एकमेकांना न बघता.

34. नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात, तर आयुष्यभर एकटे राहाल.

35. अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.

36. जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका. कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.
37. मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.

38. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा. चुकाल तेव्हा माफी मागा, अन कुणी चुकलं तर माफ करा.

39. मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणस हवीत कारण, ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी.

40. कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही, डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, अन भाषा गोड असेल तर माणस तुटत नाहीत.

41. कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा, खूप ससे येतील आडवे.बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा, जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका | कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जन येतात ते मोजा.

42. प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे, जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही प्रेमानच वागल पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही, तर तुम्ही चांगले आहात म्हणून …

43. न हरता, न थकता न थाबंता प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत.

44. कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही..आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.

45. नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.

46. छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते, तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.

47. तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.

48. व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन असण्यात खूप फरक असतो.

49. विचार असे मांडा कि तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.

50. ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्व्ठ्ला सिद्ध करण्याची जिद्द असावी.

51. कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा जास्त महत्वाची आहे.




आमचे नवे मराठी संस्कार 2 चँनल
https://youtube.com/channel/UCx6U_-6O_UED0WdaqDdUOsA

 कथा, कविता, प्रसिध्द कविच्या कविता, सुंदर विचार, सुविचार ,प्रेम कथा, भाषण, लग्न कथा तसेच थोर व्यक्तीची माहीती इतिहास हे सगळ-सगळ काही एकाच ठिकानी पाहण्यासाठी मराठी संस्कार २ ला अत्ताच.सबस्क्राईब करा
आता सध्या आम्ही जास्तीत जास्त मराठी संस्कार.२ वरच सर्व व्हिडिओ शेअर करतोत




Suvichar
Marathi vichar
Suvichar
Suvichar marathi
Svi



Marathi Suvichar, Suvichar in Marathi language, good thought, Sundar vichar, Motivational Quote, inspirational quote, positive quote, chhan Vichar Marathi, Marathi quote, मराठी प्रेरणादायक सुविचार, सुविचार मराठी, सुंदर विचार, छान विचार, मराठी सुविचार, सकारात्मक सुविचार, marathi suvichar video, मराठी संस्कार, marathi sanskar,
marathi thought status,
chote suvichar,
school suvichar,
suvichar photos,सुविचार मराठी संग्रह,
सुंदर सुविचार मराठी,
लहान सुविचार मराठी

टिप्पणी पोस्ट करा

31 टिप्पण्या

  1. All marathi suvichar are really very good. I like your article and information is also really nice which you have provided in this article. Good going keep it up.

    Marathi Suvichar

    उत्तर द्याहटवा
  2. Really khup chan sms ahet ,mast heart touching sms ,,, very good,,,,khup awadle,,,,,tnx,,,,

    उत्तर द्याहटवा
  3. आमचे नवे मराठी संस्कार 2 चँनल
    https://youtube.com/channel/UCx6U_-6O_UED0WdaqDdUOsA

    कथा, कविता, प्रसिध्द कविच्या कविता, सुंदर विचार, सुविचार ,प्रेम कथा, भाषण, लग्न कथा तसेच थोर व्यक्तीची माहीती इतिहास हे सगळ-सगळ काही एकाच ठिकानी पाहण्यासाठी मराठी संस्कार २ ला अत्ताच.सबस्क्राईब करा
    आता सध्या आम्ही जास्तीत जास्त मराठी संस्कार.२ वरच सर्व व्हिडिओ शेअर करतोत

    उत्तर द्याहटवा
  4. This is a very interesting post. Thank you so much for sharing this article with us. Wow!!! such an amazing post and wishes for the loved ones, I Really enjoyed the entire post and wishes and find some good wish for me. Thank You !!!!



    Whatsapp Group Link 2022

    Pakistani Whatsapp group link

    Indian Whatsapp Group Link

    उत्तर द्याहटवा