आ. लक्ष्मण पवार की बदामराव पंडित या चर्चेला गेवराईत आले उधाण
गेवराई, दि. २१ - विधानसभा निवडणुकीचे बिगुल शनिवार रोजी महाराष्ट्रात वाजले असुन २१ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात मतदान होणार आहे. गेवराई विधानसभा मतदार संघातील दोन्ही इच्छुक भाजप सेनेचे उमेदवार मलाच उमेदवारी मिळणार असल्याचे छातीठोक पणाने सांगत आहेत.
मात्र प्रत्यक्षात भाजपचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार की शिवसेना नेते माजीमंत्री बदामराव पंडीत या दोघा पैकी भाजप शिवसेना युती झाल्यास उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता संपुर्ण गेवराई तालुक्यासह बीड जिल्हात लागली आहे. दरम्यान या दोन नेत्यापैकी कोणाला उमेदवारी मिळणार व कोणाला मिळणार नाही हे येत्या आठवड्यातच कळणार असुन उमेदवारी आमच्याच नेत्याला मिळणार असल्याचा दावा दोन्ही इच्छुक उमेदवाराचे कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत दरम्यान दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विजयसिंह पंडित यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असुन गेवराई विधानसभेची निवडणूक दुरंगी की तिरंगी होणार याची देखील उत्सुकता गेवराई तालुक्यात लागली आहे
0 टिप्पण्या