marathi poem |
एकदा प्रेम...
घसरायचे होते, पण उताराही नव्हता जगायचे होते, पण आधारही नव्हता अहो साहेब एकदा प्रेम करायचे होत हो या आयुष्यात, पण तिचा होकारही नव्हता
मग आयुष्य असच फांद्यांसारख वाढत होत काट्यांसारखं कुरपत होत मग जीव सोडून गेला न या देहाला तेव्हा तीच मनही माझ्यासाठी झुरत होत
फक्त एकाच क्षणात मी तिला आयुष्याची साथ मागितली होती, पण तिला कुठे माहिती होत ही माझ्या जीवनाची शेवटची मागणी होती
मग कण्हत कण्हत समोर चाललेल्या या आयुष्याला जगण्याचा जणू भारच झाला होता, सखे खरंच तुझ्याविना जीवन जगण्यात काही रसच नव्हता
आता मनही कठोर झालं होत प्रेम नावाचा शब्द जीवनाच्या शब्दकोषातून बाद झाला होता प्रेम नावाच्या शब्दाच्या अगदी विरुद्ध दिशेने कार्यरत होत
पापणीत साचलेल्या अश्रूंची शपथ घेऊन सांगत होत सखे तू तुझे प्रेम नाही दिले मला,पण आजही माझं मन तुझ्या आठवणीत वाहत होत
मग आयुष्याच्या या कठीण वळणावरती कुणाचा तरी साथ घ्यायचा होता पण घसरायाचे होते उताराही नव्हता, जगायचे होते आधारही नव्हता, साहेब एकदा प्रेम करायचे होते हो या आयुष्यात पण तिचा होकारही नव्हता, पण तिचा होकारही नव्हता......
स्वप्नील नागापूरे नांदगावपेठ ता. जि. अमरावती
marathi poem on love || marathi poem || love poems in marathi romantic || marathi sad kavita on love |
शेतकऱ्याची व्यथा खरी...
त्याच्या सुखी समृद्ध जीवनाचीतो जाळत असतो वातहे जगही समृद्ध व्हावेअशी स्वप्ने ठेवतो उरात आपण जगतो ही त्याच्यासत्कर्माची आहे गोड फळे तो राबून दिवसरात्र शेतात जगापेक्षा काही करतो वेगळे
निसर्गाची तो घेऊन साथएका दाण्याचे बनवितो शंभर मनात कधी येते विचार शेतकऱ्याला मिळतो का नंबर?
ज्याच्यावर आशा ठेवून हे संपूर्ण जग आहे निर्भर साथ नाही त्याला नशिबाची तो श्वास घेतो क्षणभर
तो नाही करत काही जादू ही सर्व मेहनतीची कलाकारी आत्महत्येची ही अनर्थ दोरीपकडू नको रे माझ्या शेतकरी
हीच माझ्या शेतकऱ्याची व्यथा खरीहीच माझ्या शेतकऱ्याची व्यथा खरी.....
स्वप्नील नागापूरे नांदगावपेठ, ता. जि. अमरावती
marathi poem on love || marathi poem || love poems in marathi romantic || marathi sad kavita on love
0 टिप्पण्या