ट्रेन मधलं प्रेम
कॉलेज नुकतच पूर्ण होऊन जॉब ला लागली होती मी. कितीही डोळ्यावर झोप असली तरी धडपडत उठायचं, तयारी करायची, स्वतःचा डब्बा स्वतःच बनवायचा कसं-बसं स्टेशन पर्यंत पोहोचायचं ट्रेनची वाट बघायची किंवा ट्रेन धावत-धावत पकडायची. नेहमीची गर्दी आणि त्या गर्दी मध्ये मी दरवाजाला उभे राहून वाऱ्याचा आनंद घेणे, हे असं रोजचं चालू झालं.
अरे हो एक गोष्ट सांगायचे राहूनच गेली, एक ट्रेन आमच्या ट्रेनला रोज ठाण्याजवळ क्रॉस व्हायची आणी वळणावर जाता जाता दोन्ही ट्रेन थोड्या स्लो व्हायच्या. एक गोष्ट माझ्या लक्षात आली की समोरच्या ट्रेनमधला एक मुलगा मला दररोज बघायचा. काही वेळापुरती आमची नजरानजर व्हायची आणि ट्रेन पुढे निघून जायची.
दिसायला तो छान होता. कुरले केस आणि फॉर्मल कपडे खूप छान वाटायचा. अस बघता बघता एक महिना कधी गेला कळलं सुद्धा नाही. एक दिवस असे झाले की तो त्या ट्रेनमध्ये दिसला नाही. कामावर गेल्यानंतर मी दिवसभर हाच विचार करत होती की तो आला नाही. दुसऱ्या दिवशी तो दिसला मीही त्याला पाहून हसले आणि तोही हसला. आता मात्र मी रोज वाट पाहू लागली की ती ट्रेन कधी येते आणि मी त्याला कधी पहाते. ...
रोज तीच सवय झाली, की तो दिसला की हसायचं, त्याला हात करायचा... पण हे सगळं काही क्षणासाठी असायचं..... पण तो क्षण मला हवाहवासा वाटायचा.... असे बरेच दिवस निघून गेले ... त्या मुला बरोबर बोलावसं वाटायचं पण कसं बोलावं तेच कळत नव्हतं
एकेदिवशी समोर जेव्हा ट्रेन पास झाली तेव्हा त्याने त्याच्या खिशातला मोबाईल दाखवला ... पण नंबर कसा घ्यायचा तोपर्यंत ट्रेन निघून गेली... मनात काहूर माजलं कसा नंबर घ्यायचा त्याच्याकडून, मी त्याला कसा नंबर देऊ काही कळत नव्हते....
त्या दिवशी त्याने मला नऊ बोटे
दाखवली.... मला काही कळलेच नाही.... दुसऱ्या दिवशीही त्याने आठ बोट दाखवले.... आता मात्र मला काही कळलच नाही समजत नव्हतं की त्याला काय बोलायच आहे नक्की काय सांगायचंय दिवसभर विचार करूनही काही समजलं नाही... तिसर्या दिवशी मात्र त्याने चार बोटे दाखवले. आता असं वाटलं की कदाचित तो मला त्याचा मोबाईल नंबर सांगतोय... मी रोज त्याने दाखवली बोटे लिहून ठेवू लागले. 9 नंबर लिहून झाले... आणी शेवटी त्याने दहावा नंबर ही सांगितला..... मोबाईल नंबर पूर्ण झाला पण कॉल करू की नको हेच काही कळत नव्हते. तो नंबर मी मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवला.... दुसऱ्या दिवशी त्याने कॉल कर असा इशारा केला. आणी तेव्हा मला खात्री पटली कि हा नंबर त्याचाच आहे.... मी झटकन मोबाईल काढला. काल सेव्ह केलेल्या नंबर वर कॉल केला.... रिंग वाजली आणि येथे माझ्या हृदयात धडधड व्हायला लागली समोरून कॉल उचलला... मी शांतच होते काहीच बोलले नाही ... नंतर हळूच त्याचा आवाज आला "हॅलो".... मी ही हळूच आवाजात विचारलं "कोण बोलतोय"... "मी विनय तोच ट्रेन मधला"....
इथूनच आमच्या गप्पांना सुरुवात झाली रोज घरातून निघाले की फोन चालू.... त्याची ट्रेन नेहमीप्रमाणे आम्हाला क्रॉस व्हायची त्याला मी पहायचे, मला तो पाहायचा आणि कॉल वर बोलत आम्ही कामावर पोहोचायचं.... असे काही महिने उलटून गेले, मग आम्ही भेटायचे ठरवले ...... आमच्या पहिल्या भेटीनंतर आम्हाला सारखं सारखं भेटावसं वाटलं आणि त्या भेटी नंतर आमचं प्रेमात कधी रुपांतर झालं कळलं सुद्धा नाही.... काही वर्षानंतर आम्ही आयुष्यभरासाठी एकत्र आलो ....
ते झालेले क्षण आठवताना आता आमचा आम्हालाच हसू येतं, किती वेडेपणा केला होता.... पण तो वेडेपणा करायला एक वेगळीच मजा होती.....
अस आमचं जमलं ट्रेन मधलं प्रेम.....मीत्रानो ही स्टोरी कोणी लीहीली माहीत नाही आवडली म्हणुन शेअर केली
कथा कशी वाटली कमेंट्स करून सांगा
~heart touching true love story in marathi,
romantic love story in marathi language
heart touching true love story in marathi || love stories in marathi for reading || romantic love story in marathi language
2 टिप्पण्या
Super
उत्तर द्याहटवाThanks for sharing greatest article on your blog Love Status in Marathi
उत्तर द्याहटवा