• बीड जिल्हातील सहा विधानसभा लढतीचे 
    • चि
      त्र स्पष्ट झाले आहे

  • बीड जिल्हातील सहा विधानसभा लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे

  • बीड जिल्ह्यातील लढतीचे चित्र स्पष्ट  बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघातील लढतीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. त्यानुसार सर्वत्र भाजप- सेना आणि राष्ट्रवादी असे चित्र राहील. तर फक्त 

  • गेवराई मतदार संघात भाजपाकडून लक्षण पवार राष्ट्रवादीकडून विजयसिंह पंडित, अपक्ष म्हणून बदामराव पंडित

  •  तर वंचितकडून इंजि. विष्णू देवकते अशी चौरंगी लढत होणार आहे. 



  • बीड विधानसभा मतदार संघात ना. जयदत्त क्षीरसागर विरुद्ध त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर असा सेना-राष्ट्रवादीत सामना रंगणार आहे.

  •  इथे एमआयएम चे शफीक शेख तर वंचित कडून अशोक हिंगे हे देखील रिंगणात आहेत. तर 

  • माजलगाव मतदार संघात राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके विरुद्ध भाजपचे रमेश आडसकर यांचा अतितटीचा सामना बघायला मिळणार आहे.


  •  परळीत पंकजाताई मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी भावा बहिणीत लढत होत आहे. 


  • केज विधानसभा मतदार संघात भाजपच्या नमिता अक्षय मुंदडा विरुद्ध राष्ट्रवादीचे पृथ्वीराज साठे अशी लढत होत आहे. 

  • आष्टी विधानसभा मतदार संघात साहेबराव दरेकर आणि जयदत्त सुरेश धस यांनी माघार घेतल्याने येथे भाजपचे विद्यमान आमदार भीमराव धोंडे आणि राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे यांच्यात सरळ लढत होत आहे.