प्रेमळ नेतृत्व, *गिताराम आबा अनभुले*

  • प्रेमळ नेतृत्व,
  • *गिताराम आबा अनभुले*

  • म्हणतातं ना, माणसाला विचारांची जोड असते. आणि चांगले विचार येण्यासाठी चांगल्या शब्दांसोबत प्रेमळ माणसांची जोड असावी लागते.

  •  यातलंच एक नेतृत्व, उभरंत कर्तुत्व आणि भाटवडगाव वासियांच्या मनामनात रुजलेल मित्रत्वाचं व्यक्तिमत्त्व म्हणजे
  •  *गिताराम आबा अनभुले* 
  • गिताराम अनभुले

  •                   प्रत्येकांना आपलंच समजणारा असा हा राजकारणातला एक कार्यकर्ता, कधीही कोणास परके पणाची जाणीव होऊ न देणारा, आणि दिलेला शब्द पाळणारा, म्हणजेच शब्दाला जागणारा असा हा धडकता कार्यकर्ता याच्या नसा-नसामध्ये भिनलेलं *समाजकारण* भाटवडगाव वासीयांनी अगदी जवळून पाहिले आहे. आणि पाहात आलेले आहेत. 
  • गिताराम आबा अनभुले
    गिताराम आबा अनभुले

  • जीवनात अनेक अडथळे येतात  पण आबा याला कधी मुकले नाहीत. हलाखीच्या परिस्थितीवर मात करून
  • त्या काही अनेक अडचणीतून अनेक समस्यांमधून दोन-दोन पाऊले टाकत मजल मारत असा प्रवास आबा आजपर्यंत करत आलेले आहे....
  •                 
  •             सामाजिक बांधिलकी जोपासताना अनेकांना नकोसं वाटतं ते आपणात असणारा इगो, पण या गोष्टीला मार्ग काढत आबा कधी ईगो जवळ फिरकू पन देत नाही यामुळेच गरजूनां मदत कशी करायची? इथपासून ते समाजात वावरायचं कसं? या पर्यंत जाण करून देणारे तसेच अनेक व्यक्तिमत्व बहरवणारा असा हा उभरता चेहरा  भाटवडगावकराचा चांगलाच परिचयाचा आहे...

  • आबानी पहील्यांदाच ग्रामपचायत निवडणुक लढवली आणि जिंकलेही
  • आणि त्या पाच वर्षात आबानी गावातील सिमेंट रस्ता असो कि पाण्याचा प्रश्न असो असे अनेक प्रश्न मार्गी लावले अनेक गरजु लोकांना आर्थिक मदत देखील त्यानी केली

  • पण म्हणतात ना *चांगले कार्य करू लागले कि विरोधक आपोआप तयार होतात*
  • तसेच आबाला छोटे मोठे कार्यकर्ते विरोधक तयार झाले आणि दुसरी ग्रामपंचायत निवडणुक आली  त्यात आबाचा थोड्या फरकानी पराभव झाला खरा पण *जिंकणारा स्वतः हून म्हटला असेल हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होतो*  
  •                    
  • कारण, *जिंकणाऱ्या पेक्षा गावात चर्चा आबाची चालु होती* 
  •                    पुढे आबानी गावातील कोणत्याही कामात अडथळा येऊ दीला नाही आणि त्याच समाजकारण पुढे चालु ठेवत ते मजल दर मजल करत-करत ते आज त्याच्या पक्षात एका चांगल्या पदावर आहेत
  • व्यक्ती कितीही मोठा असला तरी त्यास एखाद्या मार्गदर्शक किंवा शिक्षक किंवा अनुभवाची गरज असते. त्याचे मार्गदर्शक सर्वात जवळचे असणारे *माजी महसूलमंत्री मा प्रकाश दादा सोळंके साहेब*

  •  राजकारणात येताना कोणी उद्दिष्ठे ठेवतो तर कोणी ठेवत नाही. एखाद्याला घरातूनच राजकारणाचं बाळकडू मिळतं पण गिताराम आबा तसे अपवाद आहेत.



  • आबा घरच्या अत्यंत नाजुक  हलाखीच्या परिस्थितीवर मात करून पुढे आलेले आहेत आपल्यावरची जी अवस्था होती ती  इतरांवर होऊ दयायची नाही या हेतूने  राजकारणात पाऊल ठेऊनं आजपर्यंत प्रवासात करत आहेत त्याच्या पुढील वाटचालीस 
  • *हार्दीक शुभेच्छा*
  •                     🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या