दोघांचा प्रेमविवाह झाला
Love stories |
दोघांचा प्रेमविवाह झाला होता लग्नाला 2 महिने झाले होते. आज तिला खूप राग आला होता ती रागात बोलली...
ती : आयुष्यात मी मोठी चुकी केली ती म्हणजे तुझ्याशी लग्न करून.
तो :तुला आज कळलं.
ती : हो ना जर आधीच कळलं असतं तर ही वेळ माझ्यावर आली नसती.
तो : मला पण तसंच वाटतं.
ती : तुला लाज वाटत नाही का असं बोलायला.
तो : यात लाज कसली.
ती : तुझ्याशी बोलून काही फायदा नाही निर्लज आहेस.
असं म्हणून ती आपली कपडे भरायला घेते त्यावेळी तो बोलतो
तो : मी मदत करू का ?
ती : नको काही गरज नाही माझं मी करते.
तो : बरं ठीक आहे पैसे वैगरे आहेत ना जायला ?
ती : तू अजिबात काळजी करु नको आहेत माझ्याकडे.
तो : खरंच तू जानार आहेस ?
ती :तुला मस्करी वाटते का ?
तो : ok ठीक आहे जा.
ती : जाणारच आहे.
तिने आपली बॅग भरली आणि ती जायला निघाली.
तो दारात उभा होता तिने मागे वळून पाहिलं नाही.
ती चालत होती. अचानक दरवाजाच्या जोरात आवाज आला. तिने मागे वळून पाहिलं तर दरवाजा बंद आणि तो घरात गेला होता. ती पळत आली दरवाजाजवळ आणि मोठयाने ओरडून लागली...
ती : अरे मी जात नाहीं plz दरवाजा खोल.
तरीही दरवाजा उघडला नव्हता. ती घाबरली. हृदयाची धडधड वाढली डोळ्यातून अश्रू ओघळली.
ती रडत रडत दरवाजा वाजवू लागली
त्यावेळी त्याने दरवाजा उघडला ती ने त्याला मीठी मारली
Love |
तो : मान्य आहे मला की मी तुझ्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही पण तुझ्या सुखासाठी वाटेल ते करायला तयार होतो तुला आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करतो
तुझ्यावर खूप प्रेम करतोय
कारण तूच माझा जीव आहेस मी तुझ्यासाठी जगतोय आणि तूच जर नसशील तर मी जगून काय करू सांग ना
ती : sorry पुन्हा अस कधी करणार नाही
मी तुला सोडून कधी जाणार नाही
तु प्रेमाने भरवलेला घास मी खाईन
तु उपाशी तर मी पण उपाशीच राहीन
माझं सर्वस्व तुला मी वाहीन.
असे बोलून परत एकदा दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि दोघेही सुख दुःखात एकमेकांना साथ देऊन हातात हात घेऊन छान संसार मांडू लागले.
आयुष्यात अशी एक व्यक्ती असावी जी सुखात साथ जेवढी देते तेवढी दुःखात ही साथ देणारी असावी अशीच आपली life partner असावी.....
Cp
5 टिप्पण्या
nice post ..
उत्तर द्याहटवाhttps://keepwritting24x7.blogspot.com/2020/04/LOVESTORY.html
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाVery nice story
उत्तर द्याहटवाTrue love like this
Very nice story
उत्तर द्याहटवाThanks for sharing such wonderful stuff. Keep sharing and keep up the good work.
उत्तर द्याहटवा