बायको सारखी प्रेयसी नाही

बायको सारखी प्रेयसी नाही

whtsapp वर Chat करणारी प्रेमिका भेटेल
पण..........
प्रत्येक मिनीटाला तुमची काळजी करणारी बायकोसारखी प्रेयसी नाही.
हाॅटेलात तुमच्या बरोबर जेवण करणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल
पण............
तुम्ही घरी येई पर्यंत जेवणासाठी वाट बघणारी बायको सारखी प्रेयसी नाही.
तुमच्याकडून गिफ्ट स्वीकारणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल
पण........
तुमच्या वाढदिवसाला गुलाबाचे फुल देणारी बायको सारखी प्रेयसी नाही.
तुमच्या बाईक वर मागे बसुन तुम्हाला घट्ट अावळून फिरणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल
पण......
तुम्ही प्रवासात असताना जेवले का म्हणून विचारणारी बायको सारखी प्रेयसी नाही.
तुमचे हातपाय दुखेल एवढी बेधूंद होऊन तुमच्या सोबत नाचणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल
पण ..............
कामावरुन थकून अाल्यावर तुमचे हातपाय दाबून देणारी बायको सारखी प्रेयसी नाही.
तुमच्या बरोबर ज्युस पिणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल
पण.....
तुम्ही ऊन्हातून अाल्यावर माठातील थंड ग्लासभर पाणी देणारी बायको सारखी प्रेयसी नाही.
तुमच्या पैशाने खरेदी करणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल
पण......
पैशाला पैसा जोडून काटकसरीचा संसार करणारी बायको सारखी प्रेयसी नाही.
बरा होशीलना लवकर ? असं म्हणणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल
पण .............
तुम्हाला ठेच लागली म्हणून डोळे भरुन येणारी बायको सारखी प्रेयसी नाही.
🍁 🍁
भेटायला यायला तुला किती वेळ लागेल ? असं विचारणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल
पण......
तुम्हाला घरी यायला उशीर झाला म्हणून उंबर्‍यात उभी राहून वाट पाहणारी बायकोसारखी प्रेयसी नाही.
Wife is life
❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤  ❤  ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤

तुझ्या दिलेल्या वचनांचे
एक एक काळे मणी
अंतरात जपून
ठेवले आहेत .......!
तूला आठवतही नसेल आता
पण एकत्र घेतलेल्या अगणित
श्वासांची शपथ.....!
तुझ्या बरोबर चालेल्या
प्रत्येक पावलात सप्तपदींचे
मंत्र जपत होते......!
तू परतणार नाहीस
तरीही
तुझ्या नावानेच
आयुष्याचा उत्सव साजरा
करणार आहे...!
तू नसतांना ... पण तरीही
कुठेतरी तुलाच शोधतांना
अंतरगाभा-यात प्राण तेवत
आहे...!
====================
बायको कोण असते...

कधी ती पायात लुडबुडणारी मांजर असते
कधी ती लाडिक चाळे करणारी प्रेयसी असते

कधी ती अटीतटीने भांडणारी विरुद्ध पार्टी असते
कधी समजून घेणारी मित्र असते

कधी त्रास देणारी डोकेदुखी असते
कधी मस्का लावणारी असते

कधी जवळ असावी असे वाटताना गैरहजर असते
आणि कधी नको असताना जवळ असते

कधी न सांगता समजून घेते
कधी गैरसमज करून घेते

कधी मुलांची काळजी करते
कधी स्वतःच्या रुपाची तारीफ करते

कधी नवर्याला नावे ठेवते
कधी नवर्याचा पगार वाढवून सांगते

कधी फिरायला नेलं कि नखरे करते
कधी हट्टउन हौस पुरवून घेते
कधी हौसेने नवीन पदार्थ करून खायला देते

कधी शॉपिंगने बेजार करते
कधी नवर्यासाठी कौतुकाने काहीतरी खरेदी करते

कधी कोणाची गुपितं सांगते
कधी कोणाला कळू न देता गुपचूप कारभार उरकते

कधी तंबी देऊनच घराबाहेर सोडते
कधी घरी यायची वाट बघत बसते

कधी सरळ सूत तर
कधी संशयाचं भूत असते

कधी नवर्याला लगाम घालू पाहते
कधी नवर्यावर प्रेमाचा वर्षाव करते

कधी शेळी तर कधी वाघ असते
कधी आंबट तर कधी गोड असते

कधी न म्हणते - आज मी दमले,
कधी न संपणारी घराची उर्जा असते

कितीही भांडली तरी मुकाट्याने जेवायला घालते...

बायको कशीही असली तरी 'वरच्या'ने बरोबर शोधून 'घरची' म्हणून आपल्याशीच जोडी लावून दिलेली असते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या