"खुप छान आहे नक्की वाचा !!!"

हॅपी थाॅट्स 
"खुप छान आहे नक्की वाचा !!!"
------------------------------------
*जन्म दिनांकाच्या दिवशीच*
*मृत्यू दिनांक ठरलेला असतो*
*मधला काळ कसा जगायचा*
*ज्याचा त्यानी ठरवायचा असतो*

*इतरांवर टीका करत जगायचं*
*का जीवनाचा आनंद घेत जगायचं*
*हे आपलं आपण बघायचं*

*सोबत येतानाच*
*दुःख किती भोगायचं*
*सुख किती द्यायचं*
*सार ठरलेलं असतं*

*माणूस विनाकारण*: *विचार करत बसतो*
*असं कसं झालं?*
*आणि तसं कसं झालं ?*

*तुमच्या अवती भवतीचे पात्रं*  *सुद्धा*
*किती चांगले , किती वाईट*
*कोण किती शिकणार ,*
*कोण कसं निघणार ?*

*लग्न होणार का नाही*
*झालं तर टिकणार का नाही*
*हे सर्व*
*"आयुष्य " नावाच्या* *नाटकातले सिन असतात*
*आपण फक्त आपला रोल* *करायचा*
*बस्स !*

*विधात्याने एकदा तुमची* *स्क्रिप्ट लिहिली की लिहिली*
*त्यात आपण बदल करू* *शकत नाही*
*हे नीट समजून घ्या*
*आणि आपलं आयुष्य मस्त पैकी जगा*

*जग बदलण्याच्या भानगडीत न पडता*
*आयुष्य " जगण्याच्या " भानगडीत पडा*
*पुढचा माणूस असाच का वागतो ,*
*तसाच का बोलतो,*
*अशा फालतू प्रश्नां वर विचार* *करू नका*
*तो त्याचा रोल आहे , त्याला दिलेले डायलॉग वेगळे आहेत*
*त्याचा रोल त्याला करू द्या*
*तुमचा रोल तुम्ही करा !*

*आयुष्य खुप सुंदर आहे,*
*नेहमी हसतमुख आणि आनंदी रहा.*


आयुष्याच हे असंच असतं...
आपल्याला आयुष्यात खुप काही हवं असतं.
पण जे हवं ते सहजपणे कधी मिळत नसतं.
म्हणुनच असंख्य चांदण्यांनी भरलेले असून सुद्धा
आपलं आभाळ मात्र नेहेमी रिक्त भासतं.
हवी असलेली गोष्टच नेमकी माणसाला मिळत नसते.
तरी मग माणसाला तिचं गोष्ट का हवी असते..?




गरुडाकडून शिकायला मिळणारी सात प्रमुख नेतृत्व कौशल्य ....

१) गरुड नेहमी अतिशय उंच आकाश पातळीवर एकटा भरारी घेतो.
तो चिमण्या,कावळे आणि इतर लहान पक्ष्यांबरोबर विहार करत नाही.

बोध :
संकुचित वृत्तीच्या लोकांपासून दूर राहा, जे तुम्हाला खाली ओढण्याचा प्रयत्न करत असतात.
लक्ष्यात ठेवा गरुडासोबत फक्त गरुडच उडू शकतो उडतो.

२) गरुडाची नजर इतकी  तीक्ष्ण आणि अचूक असते की तो ५ किलोमीटर वर असलेल्या गोष्टींवर देखील लक्ष केंद्रित करू शकतो. शिकार करताना कितीही अडथळे आले तरी आपले भक्ष्य पकडल्या शिवाय त्यावरचे एकाग्र लक्ष हटू देत नाही.

बोध :
निश्चित ध्येय, त्या प्रति सकारात्मक दृष्टीकोन आणि  कितीही अडथळे आले तरी ध्येयापासून  विचलित न होण्याची क्षमता हे गुण म्हणजे तुमच्या यशाचे आधारस्तंभ आहेत.

३) गरुड मृत किंवा आयते भक्ष कधीच खात नाही. तो फक्त ताज्या शिकाराचेच खाद्य खातो.

बोध :
आपल्या मागील यशावर विसंबून राहू नका, जिंकण्यासाठी नवीन सीमेकडे पहात रहा. भूतकाळातील तुमचे यश मागे सोडून द्या. नवीन संधी  शोधत रहा आणि आपल्या यशस्वीतेच्या नव्या   आनंदाचा रोज आस्वाद घ्या.

४) गरुडांना झंझावाती वादळे खूप आवडतात, आकाशातील अस्ताव्यस्त झालेल्या ढगांकडे पाहून ते  अधिक उत्साही होतात. वादळांना पाहून ते आकाशात उंच झेपावतात आणि वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचा उपयोग करून ते ढगांच्याही वर जाण्याचा प्रयत्न  करतात. भर वादळातील भरारीने गाठलेल्या इच्छित गगनचुंबी उंचीनंतर वाहणाऱ्या वाऱ्याचा उपयोग करून घेऊन  स्वतःच्या पंखांना विश्रांती देतात, जेव्हा इतर छोटे-मोठे पक्षी वादळाला घाबरून झाडांवरच्या पानांमागे लपून बसलेले असतात.

 बोध :
आयुष्यात येणारी अशी वादळे, अडचणी तुम्हाला अधिक मजबूत बनवत असतात हे जाणून घ्या. आव्हानांना तोंड द्या. यशस्वितेच्या खेळातला खरा खेळाडू आव्हानांना संधी समजून त्याचा फायदा करून घेतो जेव्हा इतर जण त्यांना अडचणी समजून डगमगून जातात.

५) जेव्हा मादी गरुड आणि नर गरुड एकमेकांना भेटतात आणि त्यांना संयोग करायचा असतो. तेव्हा मादी गरुड जमिनीवर उतरते, गवताची एक काडी उचलून ती पुन्हा हवेत उंच भरारी घेते आणि  आवश्यक उंची गाठल्यानंतर  ती काडी हवेत सोडून देते आणि तिच्याकडे पहात राहते. नर गरुड ती खाली जमिनीवर पोहोचण्या आधी पकडतो  आणि पुन्हा मादीकडे आणून देतो, मादी पुन्हा उंच भरारी घेते आणि पुन्हा ती काडी खाली सोडते नर  पुन्हा ती काडी जमीनीवर पोहोचण्याआधी तिच्याकडे आणून देतो आणि हा खेळ काही तास अधिकाधिक उंचीवर जात असाच चालू राहतो. जेव्हा मादीला नराच्या ती पकडण्याच्या क्षमतेची, चिकाटीची आणि तिच्याशी असलेल्या बांधिलकीची खात्री पटते तेव्हाच ती संयोगासाठी तयार होते.

बोध :
आपल्या वैयक्तिक जीवनात असो किंवा व्यवसायामध्ये असो, समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या प्रथम दर्शनी सादरीकरणाने प्रभावित न होता, त्यांच्या वचनबद्धतेची चाचणी घेत जा.

६) पिल्लांना जन्म दिल्यानंतर गरुड त्याच्या घरट्यातील पिसे आणि मऊ गवत बाजूला काढून टाकतो जेणेकरून त्याच्या नवतरूण पिलांना अस्वस्थ वाटून ती उडण्या साठी लगेच तयार होतील.

 बोध :
व्यवसायातील असो किंवा स्वतःच्या कुटुंबातील   प्रत्येकाला आणि स्वतःला त्यांच्या सुरक्षा कवचातून (कम्फर्ट झोन) मधून बाहेर काढा. हे सुरक्षा कवच तुमच्या यशात कोणत्याही प्रकारची वाढ करत नाही.

७) जेव्हा गरुड म्हातारा होतो त्याचे पंख कमकुवत होतात आणि ते त्याला त्याच्या सर्वशक्तीनिशी उडू देत नाहीत, तेव्हा गरुड एकांतात असलेल्या उंच शिखरावर जाऊन  स्वतःची सर्व पिसे उपटून टाकतो,  चोच खडकावर आपटून मोडून टाकतो, अशा रक्तरंजित अवस्थेत तो त्या पहाडावर एकांतात राहतो. जेव्हा अधिक क्षमतेचे नवे पंख आणि नवीन चोच येते तेव्हाच तो गरुड  पहिल्यापेक्षा अधिक शक्तीनिशी परततो.

बोध :
आपल्याला नवीन युगामध्ये नव्या पिढी बरोबर स्वतःच्या शक्ती सहित टिकून राहण्यासाठी, जुन्या सवयी, जुनी मूल्ये आणि संस्कृतीच्या मर्यादा मनातून काढून टाकून नवीन गोष्टी शिकुन स्वतःला शक्तिशाली बनविण्यासाठी तुम्ही सतत तयार असले पाहिजे.

कधी हार म्हणू नका !

 स्वतःलाच गरुडासारखे मजबूत बनवा !

       🙏धन्यवाद 🙏

कॉपीपेस्ट...



🌞 जीवन जगताना संगत ही खुप महत्वाची आहे.....

 बाभळीच्या झाडाशेजारी केळीचे झाड वाढलं तर❗          बाभळीच्या काट्याने त्याची संपुर्ण पाने फाटून  जातात. 
या उलट चंदनाच्या झाडाशेजारी लिंबाचं झाड वाढले
तर लिंबाच्या गाभ्याला चंदनाचा सुवास येतो. 
 ज्याप्रमाणे रामाच्या सहवासात हनुमान धन्य झाला.
 श्रीकृष्णाच्या सहवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योध्दा झाला. 
 याउलट दुर्योधनाच्या सहवासाने भीष्म, कर्ण सर्वश्रेष्ठ 
 असुनही त्यांचा नाश  झाला.
 आपण "ज्यांच्या" सोबत रहातो त्यांच्या विचारांचा, 
  रहाणीचा, वागण्याचा, "अंमल" हा आपल्यावर होत 
  असतो.
 "संगतीने विचार श्रेष्ठ अथवा दुषीत होतात" 
म्हणून चांगल्यांची संगत धरा व आपले जीवन 
सुखकर करा. 
आपलं "वय" व "पैसा" यांच्यावर कधीच घमेंड करू नये, कारण ज्या गोष्टी "मोजल्या" जातात त्या नक्कीच संपत असतात ...
" मृत्यु नंतरचं हेच कडव सत्य"

"पत्नी " दरवाजापर्यंत
"समाज" स्मशानापर्यंत
"पुत्र" अग्निदानापर्यंत
फक्त आणि फक्त  
"कर्म" ईश्वरापर्यंत
जीच्या उदरात जन्म होतो ती माता,
आणि जीच्या उदरात अस्त होतो ती माती.
यातील वेलांटीचा फरक

म्हणजेच माणसाचे जीवन......




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या