बोधकथा


एका शिक्षकाने पाण्याने भरलेला पेला हातात घेऊन आपल्या वर्गातील शिकवणीला सुरुवात केली.

त्याने तो पेला हातात वर उचलून
सर्व विद्यार्थीना दाखवला आणि विचारले की या पेल्याचे वजन किती?

५० ग्रम …. १०० ग्रम …..१२५ ग्रम … विद्यार्थीनी उतरं दिले.

जोपर्यंत मी या पेल्याचे वजन करत नाही तोपर्यंत मला हे कसे कळणार कि त्याचे वजन किती. “शिक्षक म्हणाला” पण तो माझा प्रश्न काय आहे.

“जर मी हा पेला थोडा वेळ असाचं उचलून धरू तर काय होईल?

काहीच नाही होणार असे विद्यार्थी म्हणाले.

हा पेला मी अजून एक तास उचलून ठेऊ तर काय होईल?असे शिक्षक म्हणाला.

तुमचा हात दुखेल असे एक विद्यार्थी म्हणाला.

खरे आहे पण हा पेला मी पूर्ण एक दिवस हातात धरून ठेवला तर काय होईल?

तुमचा हात सुन्न होऊ शकतो , तुमच्या मांशपेशीवर खूप ताण येऊ शकतो, हाताला लकवा मारू सकतो आणि यामुळे तुम्हाला इस्पितालामध्ये जाणायची वेळ येऊ शकते… असे एक विद्यार्थी म्हणाला आणि त्यांच्या या बोलण्यांवर काही विद्यार्थी हसू लागले.

खूपच छान पण या क्रियेमध्ये पेल्याचे वजन बदलेले? शिक्षका म्हणाला.

उत्तरं आले.. “नाही”.

तर मग हात दूखून, माझ्या मांशपेशीवर ताण का आला.

विद्यार्थीना या गोष्टीचे आश्चर्य वाटले.

शिक्षकाने पुन्हा विद्यार्थीना विचारले या दुखण्यातून सावरण्यासाठी मी काय करू?

पेल्याला खाली ठेवा. एक विद्यार्थी म्हणाला.

“अगदी बरोबर” शिक्षक म्हणाला.

जीवनात येणाऱ्या समस्या पण काहीशा अशाच आहेत.

या समस्या काही क्षण डोक्यात ठेवल्या तर तुम्हाला वाटेल सर्व ठीक आहे.

पण पुन्हा याच समस्या खूप वेळ तुमच्या डोक्यात ठेवा. जर तुम्ही या समस्या खूप वेळ

डोक्यात ठेवल्या तर त्या तुम्हाला अपंग करतील आणि मग तुम्ही काहीच करू शकणार नाही.

आपल्या जीवनात येणाऱ्या समस्यांवर विचार करण्याची गरज आहे पण जेव्हा आपण झोपायला जातो,

तेव्हा या समस्यांवर जास्त विचार करू नये. यामुळे तुम्ही सकाळी उठल्यांवर तुम्हांला ताजे-तवाने वाटेल.

आणि समोरून येणाऱ्या कोणत्याही समस्यांना सामोरे जाण्याची तुम्हांला शक्ती मिळेल.



बोधकथा आवडली असेल तर कँमेट करून सागा